तर TikTok व्हिडिओ बनविणे महागात पडू शकते

बुधवार, 20 मे 2020 (22:17 IST)
गेल्या काही दिवसांपून TikTokवर भयानक व्हिडिओ साकारण्यात येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे कपंनीने TikTok प्रेमींसाठी काही अटी आणि शर्ती लागू केल्या आहेत. किंबहूना युझर्सने हे नियम पाळले नाहीत तर त्यांच्यावर करवाई करण्यात येईल असं देखील कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. अकाऊंड सस्पेंड देखील होऊ शकत.   
 
युझर्सला  व्हिडिओ साकारताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवी हे देखील सांगितले आहे. व्हिडिओ साकारताना कोणत्याही प्रकारच्या अपशब्दा चा वापर न करण्याची सूचना TikTokकडून देण्यात आली आहे.  अपराधाला  प्रोत्साहन देणारे व्हिडिओ तयार केलेल्या युझर्सवर TikTokने करवाई देखील केली आहे. शिवाय त्यांच्यावर पोलीस स्थानकांत गुन्हा देखील नोंदवला गेल्याचं स्पष्टीकरण कंपनीने दिलं आहे. 
 
TikTokने जारी केलेल्या अटी आणि शर्तींनुसार, बेकायदेशीर आणि  शारीरिक हिंसा, शारीरिक छळ करण्याला प्रोत्साहन देणे, कोणत्याही विशिष्ट समुदायाचा अपमान करने, लिंग भेद केल्यास, कोणाचीही वैयक्तीक माहीती TikTokच्या माध्यमातून प्रदर्शित न करने, असे केल्यास कंपनी कडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं देखील सांगण्यात आले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती