राज यांची उद्धव यांना साद, ईव्हीएम मशीन विरोधात ठाकरे बंधू एकत्र

बुधवार, 29 ऑगस्ट 2018 (09:03 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद असले तरी एका मुद्द्यावर मात्र ठाकरे बंधू एकत्र येताना दिसत आहेत. निवडणुकीत ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेचा वापर करावा अशी मनसेची मागणी असून याच मुद्द्यावर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. राज ठाकरे यांनी पत्रात मनसेच्या मागणीला शिवसेनेने पाठिंबा द्यावा असं आवाहन केलं आहे. ईव्हीएमवर बंदी आणूया, किंवा निवडणुकांवर बहिष्कार घालूया असं राज ठाकरेंनी पत्रात म्हटलं आहे.
 
राज ठाकरे यांनीही नेहमीच ईव्हीएम मतदानावर संशय व्यक्त करत विरोध दर्शवला आहे. याच मुद्द्यावर त्यांनी सर्व राजकीय पक्षांना पत्र लिहिलं आहे. पत्रात त्यांनी निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएम मशीनसंदर्भात मुद्दे मांडले आहेत. राज ठाकरे यांनी हे पत्र उद्धव ठाकरे यांनाही पाठवलं आहे. पत्रात राज ठाकरे यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावर शिवसेनेने पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान दुसरीकडे, ईव्हीएमच्या मुद्द्यावर का होईना पण ठाकरे बंधू एकत्र आल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती