राज्यांचा मूड बदलतोय, कॉंग्रेस हवी भाजपा नको, मात्र पंतप्रधान पदी मोदीच

शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018 (08:20 IST)
निवडणुका येत असून अनके सर्वे सुरु आहेत. तर राजस्थानमध्ये येवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार काम सुरु केले आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपा सरकारला जोरदार फटका बसणार आहे. काँग्रेसला सत्ता स्थापनेचा कौल मिळेल असे जवळपास स्पष्ट झाले आहे. टाइम्स नाऊ - सीएनएक्सच्या निवडणूक पूर्व सर्वेक्षणानुसार ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय गणिते बदलनार आहेत.विधानसभेसाठी एकूण 200 जागा आहेत. या सर्वेक्षणानुसार, पक्षीय बलाबल पाहिले असता काँग्रेसला 110-120 तर भाजपाला 70-80 जागा मिळतील. सोबतच बीएसपी 1-3, इतर पक्षांना 7-9 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे..राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंदिया यांच्या कामगिरीवर लोकांनी फार नाराज आहेत. 48 टक्के लोकांनी कामकाज खराब असल्याचे म्हटले आहे. तर 35 टक्के लोकांनी चांगली कामगिरी केल्याचे नोंदविले आहे.त्यामुळे काँग्रेस ला संजीवनी मिळणार असे जरी असले तरी ६० टक्के जनतेला मोदीच पंतप्रधान हवे आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती