अमेरिकेतील 'या' शहरात ना मोबाइल, ना इंटरनेट ना टीव्ही

आजच्या जगात जर माणसं कोणत्या गोष्टीमुळे सर्वात जास्त वैतागले असतील तर ती गोष्ट म्हणजे मोबाइल फोन आणि इंटरनेट आहे. पण या गोष्टी आताच्या जगात फार गरजेच्या झाल्या आहेत. मोबाइल आणि इंटरनेटशिवाय राहणे कठीण होऊन बसले आहे. अमेरिकेसारख्या विकसित देशात याशिवाय पर्याय नाहीये. पण तुम्हाला हे वाचून धक्का बसेल की, अमेरिकेत असं शहर आहे जिथे मोबाइल, वायफाय आणि रेडिओ हे काहीही नाही. 
 
अमेरिकेतील वेस्ट व्हर्जिनियामध्ये पोकाहोंटस काऊंटी येथील ग्रीन बँक हे ते शहर आहे. राहण्यासाठी जगातला सर्वात शांत परिसर या ठिकाणला म्हटलं जातं. या शहरात कुणीही मोबाइल, वायफाय आणि टेलिव्हिजन वापरत नाहीत. म्हणजे पूर्वीप्रमाणे हे शहर आधुनिक तंत्रज्ञानापासून दूर आहे. या शहरात जगातला सर्वात मोठा स्टीरबल रेडिओ टेलिस्कोप रॉबर्ट सी. बार्ड ग्रीन बँक टेलिस्कोप लावला आहे. त्यामुळेच या शहरात अशा सर्व उपकरणांवर बंदी आहे जे इलेक्ट्रोमॅग्रेटिक वेब निर्माण करतात. रेडिओ टेलिस्कोप गॅलक्सीमधून येणार्‍या इलेक्ट्रोमॅग्रेटिक वेब्सची ओळख पटवतात. त्यामुळे याच्या आजूबाजूला कोणतेही वेव्हस्‌ निर्माण झाले तर हे योग्यप्रकारे रिडींग करु शकत नाही. इथे केवळ मोबाइल, वायफाय, रेडिओ किंवा टीव्हीवरच नाही तर पेट्रोल गाड्यांवरही बंदी आहे. कारण गॅसोलिन इंजीनमध्ये स्पार्कचा वापर होतो आणि यानेही इलेक्ट्रोमॅग्रेटिक लहरी तयार होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती