या शासकीय स्कीमची फ्रँचायझी घ्या आणि बंपर फायदा मिळवा

शनिवार, 13 मार्च 2021 (15:16 IST)
पोस्‍ट ऑफिसच्या बचत योजना सुरक्षित व चांगले रिटर्न्ससाठी मानल्या जातात. भारताची डाक सेवा जगभरातील सर्वात मोठी डाक सेवा आहे. भारतात सुमारे 1.55 लाख पोस्ट ऑफिस आहे. तरी अनेक असे क्षेत्र आहे जेथे पोस्ट ऑफिस उघडण्याची गरज भासते. ही कमी पूर्ण करण्यासाठी पोस्टल विभाग पोस्ट ऑफिसची फ्रँचायझी घेण्याची संधी देतं. जर आपण देखील स्वत:च काही काम सुरू करू बघत असाल तर पोस्ट ऑफिसची फ्रँचायझी आपल्या इच्छेला पंख देण्याचे काम करेल. पोस्ट ऑफिसची फ्रँचायझी घेऊन दर महिन्याला शानदार कमाई केली जाऊ शकते.
 
केवळ 5000 रुपये खर्च करा आणि अनेकपटीने लाभ घ्या
यात सर्वात फायद्याची बाब म्हणजे कमी गुंतवणुकीत बंपर फायदा मिळविण्याची संधी. पोस्ट ऑफिसच्या फ्रँचायझी बिझनेसची सुरुवात करण्यासाठी आपल्याला केवळ 5,000 रुपये खर्च करावे लागतील. या स्कीम अंतर्गत दोन प्रकाराची फ्रँचायझी दिली जाते. पहिली आउटलेट फ्रँचायझी आणि दुसरी पोस्टल एजेंट फ्रँचायझी, या दोन्हीत अंतर आहे. जर आपण रोजगार शोधात असाल तर ही संधी सुवर्ण ठरू शकते.
 
दो प्रकाराची फ्रँचायझी 
पोस्ट ऑफिस दोन प्रकाराची फ्रँचायझी देतं. पहिली आउटलेट फ्रँचायझी आणि दुसरी पोस्टल एजेंट्स फ्रँचायझी. आपण या दोन्हीपैकी कोणत्याही फ्रँचायझीसाठी अर्ज करू शकता. जेथे पोस्ट ऑफिस उघडण्याची गरज भासत आहे, परंतू असे करणे शक्य नाही तेथील लोकांना सुविधा देण्यासाठी फ्रँचायझ आउटलेट उघडता येईल. या व्यतिरिक्त असे एजेंट्स जे शहरी आणि ग्रामीण भागात पोस्टल स्टेम्प्स आणि स्टेशनरी घरोघरी पोहचतात. याला पोस्टल एजेंट्स फ्रँचायझी नावाने ओळखलं जातं.
 
पोस्ट ऑफिस फ्रँचायझी साठी या प्रकारे करा अर्ज
आपल्याला सर्वात आधी ही लिंक दिली जात आहे ज्याद्वारे अर्ज करता येईल.
https://www.indiapost.gov.in/VAS/DOP_PDFFiles/Franchise.pdf या अधिकृत लिंकवर क्लिक करा. येथे क्लिक केल्यावर आपल्याला फार्म डाउनलोड करावा लागेल. 
 
फार्म भरून आपण अर्ज करू शकता. निवडलेल्या लोकांना पोस्ट डिपार्टमेंटसह एक एमओयू साइन करावं लागतं. यानंतर ते ग्राहकांना सुविधा प्रदान करू शकतात.
 
8वी पास असणे आवश्यक, फ्रँचायझी घेण्यासाठी अटी
पोस्ट ऑफिस फ्रँचायझी कोणताही भारतीय नागरिक घेऊ शकतात. परंतू यासाठी किमान वय 18 वर्षे आणि शिक्षण म्हणून किमान आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कोणत्याही मान्यात प्राप्त शाळेतून आठवी उत्तीर्ण फ्रँचायझी घेऊ शकतात. पोस्ट ऑफिसच्या फ्रँचायझीसाठी आपल्याला 5000 रुपये सिक्यॉरिटी म्हणून जमा करावे लागतात. फ्रँचायझी मिळाल्यावर आपल्याला आपल्या कामाच्या हिशोबाने एक ठराविक कमिशन दिलं जातं.
 
फ्रँचायझी घेल्यावर काय काय करावं लागतं
फ्रँचायझी घेतल्यावर आपल्याला डाकघरहून मिळणार्‍या सर्व लहान-मोठ्या सुविधा द्याव्या लागतात. यात स्टांप, स्टेशनरी, स्पीड पोस्ट, मनी ऑर्डर सारख्या सुविधा सामील असतात. यासाठी आपण फ्रँचायझी आउटलेट देखील उघडू शकतात किंवा पोस्टल एजेंट बनून घरोघरी जाऊन हे काम करू शकता.
 
पोस्ट ऑफिसच्या टॉप 9 सेविंग्‍स स्‍कीम व्याज दर
सुकन्‍या समृद्धी योजना (एसएसव्हाय) 7.6% 
सीनियर सिटीजन सेविंग्‍स स्‍कीम (एससीएसएस) 7.4% 
नॅशनल सेविंग्‍स सर्टिफिकेट (एनएससी) 6.8% 
पब्लिक प्रोविडेंट फंड (पीपीएफ) 7.1% 
किसान विकास पत्र (केव्हीपी) 6.9% 
पोस्‍ट ऑफिस मंथली इन्कम स्‍कीम (पीओएमआयएस) 6.6% 
पोस्‍ट ऑफिस सेविंग्‍स अकाउंट 4% 
पोस्‍ट ऑफिस टाइम डिपॉझिट अकाउंट 6.7% 
पोस्‍ट ऑफिस रेकरिंग डिपॉझिट 5.8%

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती