दिवसाला सरासरी 20 हजार शब्द बोलते एक महिला

सोमवार, 9 एप्रिल 2018 (11:28 IST)
महिला बोलघेवड्या असतात. म्हणजे जास्त बोलतात. हे आता संशोधनातूनही सिद्ध झाले आहे. एका ताज्या अहवालानुसार, एक महिला दिवसभरात सरासरी 20 हजार शब्द बोलते. दुसरीकडे पुरुष मात्र एक दिवसात 13 हजार शब्दच बोलतात. महिलांच्या जास्त बोलण्याचे शास्त्रीय कारणही शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले. अमेरिकेतील मेरीलँड विद्यापीठातील तज्ज्ञांच्या माहितीनुसार, महिलांच्या मेंदूत फॉक्स पी2 नामक केमिकल जास्त प्रमाणात असते. फॉक्स पी2 एकप्रकारचे लँग्वेज प्रोटीन असते. त्याच्यामुळेच मुलांच्या तुलनेत मुली लवकर बोलण्यास सुरुवात करतात. याच प्रोटीनमुळे मुलांचा शब्दकोष जास्त मोठा असतो. नोकरी करणार्‍या महिला जेवणाच्या सुटीत जास्त बोलतात. त्या ऑफिसला जाता-येताना अनोळखी लोकांसोबतही बोलतात. इतर वेळी सतत बडबड करणार्‍या महिला ऑफिसच्या मीटिंगमध्ये मात्रफारशा बोलत नाहीत. तिथे पुरुष जास्त बोलतात. मीटिंगमध्ये महिला कर्मचार्‍यांद्वारे बोललेले सर्वात लांब वाक्यही पुरुष कर्मचार्‍यांच्या सर्वात छोट्या वाक्यापेक्षा कमी असते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती