फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ प्लॅटफॉर्म सुरु केले आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यामातून फ्लिपकार्टने आता मनोरंजन क्षेत्रात देखील पाऊल ठेवले आहे.
 
येत्या काही महिन्यांत स्टुडिओ नेक्स्ट, फ्रेम्स आणि सिख्या प्रॉडक्शन्स यांसारख्या गुणवान आणि प्रतिष्ठित निर्मिती संस्थांसह फ्लिपकार्ट काम करणार असून विविध भाषांमधील विविध प्रकारचे अभूतपूर्व असे कंटेंट प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. फरहा खान संचालित ‘बॅकबेंचर्स’ ही पहिली ओरिजिनल मालिका या महिन्यातच उपलब्ध होणार असून या मालिकेत भारतातील अनेक लोकप्रिय सेलिब्रिटीज भूतकाळातील त्यांच्या जिव्हाळ्याच्या आठवणींना उजळा देताना दिसतील.
 
फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स संदर्भात फ्लिपकार्टच्या ग्रोथ व मॉनिटायझेशन विभागाचे उपाध्यक्ष प्रकाश सिकारिया म्हणाले, आम्ही काही महिन्यांपूर्वी आमची व्हिडिओ सेवा सुरू केली, त्यावेळी आमचे ध्येय स्पष्ट होते. इंटरनेटचा वापर करणाऱ्या, पण ई-कॉमर्सपासून काही कारणांनी लांब राहिलेल्या ग्राहकांना जोडण्यात भूमिका बजावण्यासाठी आम्ही उत्सुक होतो. ही सेवा सुरू झाल्यापासून पहिल्या दोन महिन्यांतच ग्राहकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. या प्रतिसादामुळेच प्रोत्साहित होत आम्ही आता आमच्या ग्राहकांसाठी ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ हे नवे आकर्षण घेऊन आलो आहोत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती