तरुणाईला वेड लावणाऱ्या 'पबजी गेम' वर बंदी

बुधवार, 2 सप्टेंबर 2020 (20:11 IST)
केंद्र सरकारने ११८ अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ही बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये तरुणांमध्ये प्रचंड वेड असणाऱ्या पबजी गेमचाही समावेश आहे. भारताच्या सायबर स्पेसची सुरक्षा आणि सार्वभौमत्व राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचं मंत्रालयाने निर्णय जाहीर करताना सांगितलं आहे. याबाबतची बातमी पीटीआय या वृत्त संस्थेने दिली  आहे.
 
माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६९ अ अंतर्गत पबजी मोबाइल गेमवर बंदी आणण्यात आली आहे. 
 
बंदी घालण्यात आलेल्या ऍपमध्ये ऍपलॉक, ऍपलॉक लाईट, ड्युअल स्पेस, क्लीनर, एचडी कॅमेरा सेल्फी, म्युझिक प्लेअर, ल्युडो ऑल स्टार प्ले, ब्युटी कॅमेरा प्लस या आणि अशा अणखी बऱ्याच ऍपचा समावेश आहे. 
 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून चीनच्या ५९ ऍपवर बंदी घालण्यात आली होती. ज्यामध्ये टीकटॉक, युसी ब्राऊजर, वेबो यांसारख्या ऍपचा समावेश होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती