डॉक्टरला खुन्नस देणार्‍या नवजात मुलीचा फोटो व्हायरल

सोमवार, 24 फेब्रुवारी 2020 (12:02 IST)
सोशल मिडियावर एका लहान बाळाचा फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे. हा फोटो व्हायरल होण्याचे कारण म्हणजे जन्माच्या लगेच नंतर बाळाने दिलेले एक्सप्रेशन. 
 
ब्राझीलमधील रिओ डी जेनेरियोमधील एका रुग्णालयातील 13 फेब्रुवारी रोजी टिपलेला हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. येथे एका महिलेने एका मुलीला जन्म दिला. मात्र या मुलीची नाळ कापण्याआधी डॉक्टरांकडून जेव्हा तिला रडवण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा मुलीच्या चेहऱ्यावर संतापलेले हावभाव दिसले. नवजातच्या चेहऱ्यावरील असे विचित्र हावभाव बघून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं. या मुलीचे जन्मानंतरचे हे हावभाव टिपण्यात आले. 
 
सामान्यपणे बाळा जन्माला आल्यावर ते रडते. मात्र ही चिमुकली जन्मानंतर रडली नाही आणि तिचा प्रतिसाद मिळावा म्हणून डॉक्टरांनी तिला रडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा  रडण्याऐवजी तिने संतापलेले हावभाव दिले. तेव्हा मुलीच्या जन्मानंतरचे फोटो काढण्यासाठी नेमलेल्या डॅनियनने रोड्रीगो कुन्स्तामान या फोटोग्राफरने तिचा हा फोटो घेतला. नाळ कापल्यानंतर मात्र ती चिमुकली रडू लागली.
 
हा फोटो अनेकांनी मिम्स म्हणून शेअर केला आहे. तिच्या या एक्सप्रेशनमुळे ती प्रचंड लोकप्रिय झाली आहे.
 
"डॉक्टरांनी रडवण्याचा प्रयत्न करताना या मुलीने रडण्याऐवजी संतापलेले एक्सप्रेशन दिले. त्याचवेळी मी फोटो क्लिक केला. नाळ कापल्यानंतर मात्र ती चिमुकली रडू लागली.  मुलीचे नाव इसाबेल असं ठेवण्यात आलं आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती