भाजपा २४० जागांवर आघाडीवर

गुरूवार, 23 मे 2019 (09:54 IST)
जगातील सर्वांत मोठी लोकशाही प्रक्रिया असणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी सुरु झाली असून थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्ता राखणार की सत्ता परिवर्तन होणार याविषयीची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांनी (एक्‍झिट पोल) भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला दुसरा कार्यकाळ लाभणार असल्याचे भाकीत केले आहे. तर एनडीएला मोठा हादरा बसणार असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. यापार्श्‍वभूमीवर, देशातील जनतेचा कौल कुणाला मिळणार हे लोकसभा निवडणुकीच्या निकालातून समोर येईल.
 
पटनासाहिब येथे भाजप उमेदवार रविशंकर प्रसाद यांची काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर आघाडी.
 
पंजाबमधील गुरुदासपूर येथील जागेवर भाजप उमेदवार सनी देओल यांनी आघाडी घेतली आहे.
 
भाजपाची भोपाळ उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आघाडी घेतली आहे तर काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह पिछाडीवर आहेत.
 
उत्तर प्रदेशमधील अमेठीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे पिछाडीवर, भाजपाच्या उमेदवार स्मृती इराणी आघाडीवर आहेत. 
 
५४२ पैकी ७१ जागांवरील सुरुवातीचे कल हाती आले असून भाजपा ४४, काँग्रेस २३ आणि अन्य पक्ष ४ जागांवर आघाडीवर आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती