उस्मानाबाद लोकसभा निवडणूक निकाल 2019 live results

[$--lok#2019#state#maharashtra--$] 
मुख्य लढत : ओमराजे निंबाळकर (शिवसेना) विरुद्ध राणा जगजितसिंग (राष्ट्रवादी)
 
उस्मानाबादेतून शिवसेनेने विद्यमान खासदार रवींद्र गायकवाडांना बाद करत ओमराजे निंबाळकर यांना तिकीट दिलं आहे. राष्ट्रवादीकडून माजी खासदार पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एकमेकांचे हडवैरी मानले जाणारे दोन भावांमध्ये टक्कर पाहायला मिळणार आहे. ओमराजे निंबाळकर यांनी २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला होता. तर २०१४  साली राणा पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांचा दारुण पराभव केला होता.
 
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.
 
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली. 
 
इकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने क्रमश: 26 आणि 22 मतदारसंघांमधून आपले उमेदवार उभे केले होते.
[$--lok#2019#constituency#maharashtra--$] 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती