गौतम गंभीरवर टीका करतांना आप उमेदवार रडल्या

शुक्रवार, 10 मे 2019 (09:46 IST)
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील प्रचार संपला. सहाव्या टप्प्यात दिल्लीतील सर्व जागांवर (नवी दिल्ली, पूर्व दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली, उत्तर-पूर्व दिल्ली, उत्तर-पश्चिम दिल्ली आणि चांदणी चौक) मतदान होणार आहे. या प्रचारा दरम्यान, पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील आम आदमी पार्टीच्या उमेदवार आतिशी यांनी गुरुवारी भाजपा उमेदवार गौतम गंभीर यांच्यावर निशाणा साधला आहे. अतिशी यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी गौतम गंभीर यांनी काढलेले एक पत्रकच वाचून दाखवले. त्यामधील आक्षेपार्ह टिप्पणी वाचताना आतिशी या भावूक झाल्या आणि त्यांना रडू कोसळले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती