चंद्राबाबू नायडू यांनी सुरु केले भेट सत्र

शनिवार, 18 मे 2019 (17:53 IST)
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर दुपारच्या सत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीभेट घेतली. 
 
कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यास प्रादेशिक पक्षाचे महत्त्व वाढणार आहे. त्यामुळे मोर्चेबांधणीसाठी चंद्रबाबू नायडू यांनी पायाला भिंगरी लावली आहे.  चंद्राबाबू नायडू बसपा नेत्या मायावती यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची सुद्धा भेट घेणार आहेत. कधीकाळी एनडीएमध्ये राहिलेल्या चंद्रबाबू नायड़ू यांनी  आता फारकत घेतली आहे. भाजपविरोधात मोट बांधण्यासाठी चंद्रबाबू नायडू यांनी आघाडी घेतली आहे. दुसरीकडे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सुद्धा विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांची २१ मे रोजी बैठक बोलावली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती