नवे नियम लागू झाल्यास भारतात व्हॉट्‌सअ‍ॅप बंद होणार?

शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019 (15:00 IST)
व्हॉट्‌सअ‍ॅपवरून अफवा पसरवणार्‍यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. भारतात व्यवसाय करणार्‍या सोशल मीडिया कंपन्यांसाठी सरकारने नवीन नियमावली तयार केली आहे. परंतु, सरकारचे नियम कठोर असल्याने त्याचा उलटा परिणाम व्हॉट्‌सअ‍ॅपवर होण्याची शक्यता आहे. सरकारचे प्रस्तावित नियम जर लागू झाले तर भारतातील व्हॉट्‌सअ‍ॅपची सेवा बंद होऊ शकते, अशी भीती एका अधिकार्‍याने वर्तवली आहे.
 
व्हॉट्‌सअ‍ॅपचे जगभरात 1.5 अब्ज ग्राहक आहेत. तर भारतात 20 कोटी ग्राहक आहेत. सोशल मीडिया कंपन्यांसाठी जगातील सर्वाधिक मोठी बाजारपेठ ही भारतात आहे. सरकारने या कंपन्यासाठी नवीन नियावली तयार केली आहे. प्रस्तावित नियमांमध्ये सर्वात जास्त चिंतेची बाब म्हणजे व्हॉट्‌सअ‍ॅपमधील मेसेजना ट्रेस करणे हे होय, असे व्हॉट्‌सअ‍ॅपचे कम्युनिकेशन प्रमुख कार्ल वूग यांनी सांगितले. व्हॉट्‌सअ‍ॅपमध्ये एन्ड टू एन्ड एनक्रिप्शन फीचर आहे. या फीचरमुळे व्हॉट्‌सअ‍ॅपवर मेसेज पाठवणारा आणि ज्याला मेसेज मिळाला आहे, असे दोघेच हा मेसेज वाचू शकतात. इतकेच काय तर व्हॉट्‌सअ‍ॅप कंपनीही हे मेसेज वाचू शकत नाहीत. सुरक्षेच्या दृष्टीने एन्ड टू एन्ड एनक्रिप्शन फीचर खूप महत्त्वाचे आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती