Whatsapp ने आणला आहे मोठा 'धमाका', प्रत्येक क्रिकेट प्रेमीसाठी जाणून घेणे आहे गरजेचे!

मंगळवार, 30 एप्रिल 2019 (15:09 IST)
मागील काही दिवसांपासून IPL 2019 सुरू आहे. जर तुम्हाला आयपीएल बघणे आवडत असेल तर त्यासाठी इंस्टँट मेसेजिंग एप व्हाट्सएप (Whatsapp) एक शानदार 'गिफ्ट' घेऊन आले आहे. महत्त्वाचे म्हणजे हे गिफ्ट क्रिकेट स्टिकर्स (Whatsapp cricket stickers) आहे जे कंपनीने आयपीएलला   सेलिब्रेट करण्यासाठी आधिकारिकरित्या लॉन्च केले आहे.   
 
Whatsapp ने Cricket Stickers सध्या एंड्रॉयड यूजर्ससाठी लॉन्च केले आहे पण लवकरच आयफोन यूजर्ससाठी देखील हे स्टिकर्स सादर करण्यात येईल. सांगायचे म्हणजे व्हाट्सएपने मागील वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात Stickers फीचरला लाँच केले होते.   
 
Whatsapp Cricket Stickers ला यूजर्स डाउनलोड इमोजी सेक्शनमधून करू शकता. त्यानंतर ते आपले मित्र किंवा मित्रांना क्रिकेट स्टिकर्स शेयर करू शकतील. Whatsapp Cricket Stickers ला डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी एंड्रॉयड यूजर्सला चॅटच्या स्टिकर स्टोअरमध्ये जावे लागणार आहे. तेथे तुम्हाला क्रिकेटशी निगडित स्टिकर्स मिळतील, ज्याला तुम्हाला डाउनलोड करावे लागणार आहे.  
 
मागच्या वर्षी ऑक्टोबरच्या शेवटी Whatsapp ने एक शानदार अपडेट प्रसिद्ध केले होते. या अपडेटमध्ये यूजर्स आपले मित्र किंवा ओळखीच्या लोकांना स्टिकर्स पाठवू शकतात. Whatsapp stickers feature आयओएस आणि एंड्रॉयड दोन्ही वर काम करतात. या स्टिकर्सचा वापर करण्यासाठी Whatsapp ने एक डेडिकेटेड स्टिकर्स स्टोअर दिला आहे. या स्टोअरहून तुम्ही स्टिकर्स डाउनलोड करून मित्रांना पाठवू शकता. Whatsappच्या या फीचरहून एपला वापर करण्याचा आनंद द्विगुणित होऊन जातो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती