व्हॉट्सअॅप ग्रुप सदस्याला 5 दिवसांची पोलिस कोठडी

सोमवार, 20 मार्च 2017 (10:27 IST)
उल्हासनगरमध्ये वादग्रस्त पोस्ट टाकल्यानं व्हॉट्सअॅप ग्रुपच्या एका सदस्याला 5 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. विनय कलनानी असं या व्हॉट्सअॅप ग्रुपमधील सदस्याचं नाव आहे. शनिवारी विनयने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमुळे भावना दुखावल्याचा आरोप ग्रुपमधील इतर सदस्यांनी केला. त्यांनी याची तक्रार करण्यासाठी थेट पोलीस स्टेशन गाठलं. त्यानंतर पोलिसांनी विनय कलनानीला अटक केली. न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

वेबदुनिया वर वाचा