जीमेलवर आता मिळेल व्हाट्सएपप्रमाणे ईमेल वाचल्याची रिपोर्ट

गुरूवार, 1 ऑगस्ट 2019 (13:08 IST)
जसे व्हाट्सएपवर तुम्हाला कळत की समोरच्या व्यक्तीने तुमचे मेसेज वाचले आहे की नाही, त्याचप्रमाणे आता तुम्ही जाणून घेऊ शकता की समोरच्या व्यक्तीने ईमेल बघितले की नाही. मोफतमध्ये मिळणारा ऑनलाईन टूल मेलट्रॅकच्या माध्यमाने हे शक्य झाले आहे. याचा वापर करण्यासाठी https://mailtrack.io/en/ वर जा.   
 
त्यानंतर साईटवर देण्यात आलेले ‘गेट मेल ट्रॅक’ वर क्लिक करा. त्याने ही वेबसाइट तुमच्या जीमेल आयडीसोबत जुळून जाईल आणि तुम्ही ज्याला ईमेल पाठवाल, त्याची डिलीवरी रिपोर्ट तुमच्यापर्यंत पोहोचेल. यात ही माहिती देखील मिळेल की तुमच्या ई-मेलला कोणी कोणी कोणत्या कोणत्या वेळेस ओपन केले आहे.
 
‘स्ट्रीक’ एपची देखील मदत घेऊ शकता
स्ट्रीक एपच्या वापरासाठी https://www.streak.com/email-tracking-in-gmail वर जा आणि इंस्टॉलच्या विकल्पावर क्लिक करा. यामुळे हा एप तुमच्या जीमेलला जुळेल. यानंतर तुमचा ईमेल केव्हा केव्हा, किती वेळा ओपन करण्यात आला आहे, याची माहिती तुम्ही मिळवू शकता. स्ट्रीकच्या माध्यमाने शेड्यूल पोस्ट देखील पाठवू शकता. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती