गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

मंगळवार, 25 जून 2019 (16:41 IST)
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून 30 लाखांपेक्षा अधिक व्यावसायीक अकाऊंट बंद केले असून, कंपनीच्या ब्लॉगनुसार बोगस अकाऊंटद्वारे ग्राहकांची फसवणूक होऊ शकत होती त्यामुळे ही टोकाची कारवाई केली आहे. अनेकदा हे व्यावसायीक फसवणूक करण्यासाठी स्थानिक पत्त्यानुसार लिस्टिंग करतात त्यामुळे सामन्य माणसाला लगेच विश्वास बसतो त्याचाच हे बोगस लोक फायदा घेतात. गुगल लोकांना व्यवसायासोबत जोडण्यासाठी, संपर्क आणि त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी रस्ता दाखवण्याची सेवा देते. गुगल मॅप्सचे प्रोडक्ट डायरेक्टर ईथन रसेल यांनी नुकतेच एका ब्लॉगमध्ये म्हटले की बोगस व्यावसायीक मोफत गोष्टींसाठीही पैसे घेतात. ते स्वत:ला खरे व्यावसायीक सांगत ग्राहकांसोबत फसवणूक करतात. गुगल अशा टेक्नोलॉजीचा वापर करते ज्यामुळे आमच्या प्लॅटफॉर्मवर कुणाची फसवणूक होणार नाही. त्यामुळे अश्या लोकांना वेळीच आवर घालणे गरजेचे होते म्हणून गुगलने ही सर्व खाती बंद केली आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती