भारत संचार निगम लिमिटेडचे रविवारी फ्री कॉलिंग सेवा बंद

मंगळवार, 30 जानेवारी 2018 (10:50 IST)
भारत संचार निगम लिमिटेडचे आपल्या लँडलाईन युजर्सला रविवारी मिळणारी फ्री कॉलिंग सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. फ्री कॉलिंगची ही सेवा १ फेब्रुवारीपासून बंद करण्याचा निर्णय बीएसएनएलने घेतला आहे.बीएसएनएलच्या कोलकाता टेलिफोन्स (कालटेल) येथील मुख्य व्यवस्थापक एसपी त्रिपाठी यांनी सांगितले की, बीएसएनएलतर्फे रविवारसाठी देण्यात येणारी फ्री कॉलिंगची सेवा एक फेब्रुवारीपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय संपूर्ण देशभरात लागू होणार आहे. मात्र, आम्ही काही योजना तयार करत आहोत ज्याच्या आधारे ग्राहकांना नुकसान होणार नाही. या निर्णयापूर्वी रात्री मिळणाऱ्या फ्री कॉलिंगच्या सेवेत कपात केली होती. बीएसएनएलने २१ ऑगस्ट २०१६ रोजी रात्री मोफत कॉलिंग आणि रविवारी मोफत कॉलिंगची सेवा पुरवण्यास सुरुवात केली होती. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती