फेसबुकने कोरोना संबंधात 70 लाख खोट्या, गैरसमज पसरवणाऱ्या पोस्ट हटवल्या

शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020 (08:59 IST)
कोरोना व्हायरसबाबत  दिशाभूल करणाऱ्या आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्या पोस्टविरोधात फेसबुकने कारवाई केली आहे. दुसऱ्या तिमाहीत फेसबुकने कोरोना संबंधात 70 लाख खोट्या, गैरसमज पसरवणाऱ्या पोस्ट हटवल्या आहेत. यामध्ये व्हायरसपासून बचाव करण्यासाठी अविश्वसनीय उपायांशी संबंधित पोस्टचाही समावेश आहे.
 
फेसबुकने Community Standards Enforcement Report अंतर्गत, हे आकडे जारी केले आहेत. फेसबुकने याबाबत बोलताना सांगितलं की, त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिशाभूल करणारी आणि चुकीची माहिती पसरण्यापासून, रोखण्याच्या दिशेने ते सातत्याने काम करत आहेत. 
 
सोशल मीडिया फेसबुकने, दुसर्‍या तिमाहीत द्वेष पसरवणारी 2.25 कोटी (22.5 मिलियन) भाषणं आपल्या फ्लॅगशिप अ‍ॅपवरुन हटवली आहेत. यादरम्यान फेसबुकने दहशतवादी संघटनांशी संबंधित जवळपास 87 लाख पोस्टही हटवल्या आहेत. तर गेल्या तीन महिन्यात 63 लाख पोस्ट हटवल्या आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती