'टिकटॉक'ला शिल्पा शेट्टी देणार टक्कर !

सोमवार, 2 नोव्हेंबर 2020 (14:08 IST)
साधारण एका महिन्यापूर्वी भारताने टिकटॉक, पबजी, बिगोसह 100 हून अधिक चीनी अॅप्सवर बंदी घातली आहे. या नंतर बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारने पबजी प्रेमींसाठी पर्याय म्हणून भारतीय 'फौ-जी' तयार करणार असल्याचे म्हटले होते. आता अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्रा (Shilpa Shetty) आणि तिचा नवरा राज कुंद्रा (Raj Kundra) हे देखील टिकटॉकला टक्कर देणाऱ्या भारतीय लाईव्ह स्ट्रीमिंग अॅापची (app launch)निर्मिती करत असल्याचे कळते आहे.
 
स्वतः राज कुंद्रा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, 'जेएल स्ट्रीम हे अनेक वैशिष्ट्यांसह बनविलेले भारतीय लाईव्ह स्ट्रीमिंग अॅचप आहे. काही चिनी अॅप्स भारतात बंदी असूनही सर्व्हर सुरू ठेवून आणि मिकोचे मिका असे नाव बदल करून सर्रास भारतात वापरले जात आहेत. चीनी अॅप्सवर बंदी असल्याने ते हाँगकाँगचे असल्याचा दावा करतात. अशा अपराधींना शिक्षा झाली पाहिजे. भारतीयांनी अशा अॅप्सना प्रोत्साहन न देता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे'.
शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि राज कुंद्रा याचे हे नवे अॅप www.jlstream.com वर चीन वगळता संपूर्ण जगभरात उपलब्ध होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती