आता व्हॉट्सअॅप स्टेटस फेसबुक स्टोरीमध्येही करा शेअर

सोमवार, 23 सप्टेंबर 2019 (10:17 IST)
व्हॉट्सअॅपमध्ये एक नवीन फीचर आणलं आहे. आता व्हॉट्सअॅप युजर्स थेट व्हॉट्सअॅप स्टेटस फेसबुक स्टोरीमध्येही शेअर करु शकणार आहेत. इन्स्टाग्रामध्ये फेसबुकवर स्टोरी शेअर करण्याचा पर्याय पहिल्यापासून दिलेला आहे. आता हे फीचर व्हॉट्सअॅपवरही आले आहे. जून 2019 मध्ये काही युजर्सला या फीचरच्या बीटा व्हर्जनचा अॅक्सेस देण्यात आला होता. आता याचा स्टेबल व्हर्जनचा सर्व युजर्ससाठी उपलब्ध आहे.
 
माय स्टेटसमध्ये जाऊन जे स्टेटस  फेसबुक स्टोरीवर घ्यायचे आहे, त्याच्या बाजूला दिसत असलेल्या हॅमबर्गर (3 डॉट) आयकॉनवर क्लिक करा. तिथे शेअर टू फेसबुक पर्याय दिसेल. क्लिक केल्यानंतर डिफॉल्ट प्रायव्हेसी सेटिंगसह फेसबुक प्रोफाईल फोटो दिसेल. स्टेटस शेअर करण्यापूर्वी प्रायव्हेसी ऑप्शन सिलेक्ट करु शकता. प्रायव्हेसी सिलेक्ट केल्यानंतर शेअर नाऊ वर क्लिक करा.
 
शेअर केल्यानंतर स्टोरी 24 तासासाठी व्हिजिबल राहील. ओरिजनल व्हॉट्सअॅप स्टेटस डिलीट केल्यानंतर फेसबुक स्टेटसवर ती स्टोरी राहील. फेसबुक स्टोरीवर शेअर केलेले व्हॉट्सअप स्टेटस स्क्रीनशॉटप्रमाणे दिसेल. दरम्यान, व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये शेअर केलेली लिंक फेसबुक स्टोरीमध्ये गेल्यावर क्लिक होऊ शकणार नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती