सॅमसंग पुन्हा नंबर वन; 'शाओमी'ची धोबीपछाड

शनिवार, 28 जुलै 2018 (00:20 IST)
ओप्पो, विवो, शाओमी या नवख्या कंपन्यांच्या नवनव्या ब्रँडमुळे गेली दोन वर्षे मागे पडलेल्या सॅमसंगने भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये दमदार पुनरागमन केले आहे. 'रेडमी' सिरीजच्या जोरावर अल्पावधीतच स्मार्टफोनचे मार्केट ताब्यात घेणार्‍या शाओमीला धोबीपछाड देत सॅमसंगने पुन्हा पहिला नंबर पटकावला आहे.
 
'काउंटरपॉइंट' या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, भारतात स्मार्टफोनच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा स्मार्टफोनची मागणी 18 टक्क्यांनी वाढली आहे. यात सॅमसंगचा हिस्सा 29 टक्के आहे. तर, शाओमीचा 28 टक्के आहे.
 
मागील तिमाहीत स्मार्टफोन मार्केटमध्ये सॅमसंगचा वाटा 24 टक्के इतका होता. तो आता 29 टक्क्यांवर गेला आहे. सॅमसंग व शाओमीनंतर विवो 12 टक्के, ओप्पो 10 टक्के या कंपन्या अनुक्रमे दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकावर आहेत. हुवाईचा 'हॉनर' हा ब्रँड 3 टक्क्यांसह पाचव्या स्थानावर आहे. पहिल्या पाच कंपन्यांकडे मार्केटचा 82 टक्के हिस्सा आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती