Reliance Jio ने उड्डाणच्या (फ्लाईट)दरम्यान कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या लायसेंससाठी अर्ज केले

बुधवार, 17 एप्रिल 2019 (15:40 IST)
रिलायन्स जियो इन्फोकॉमने फ्लाईट दरम्यान कनेक्टिव्हिटी लायसेंससाठी दूरसंचार विभागापुढे अर्ज दिलेला आहे. परवाना मिळवल्यानंतर सेवा प्रदाता भारतीय आणि विदेशी विमान कंपन्यांना कनेक्टिव्हिटी आणि डेटा सेवा उपलब्ध करवू शकतील. मिळालेल्या वृत्तानुसार जिओ व्यतिरिक्त दूरसंचार विभागाला ओर्टस कम्युनिकेशन्स, स्टेशन सेटकॉम आणि क्लाउड कास्ट डिजीटलसह इतर कंपन्यांकडून देखील अर्ज प्राप्त झाले आहे.
 
तथापि, रिलायंस जिओने या संदर्भात पाठवलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिला आहे. सूत्रांनी सांगितले की दूरसंचार विभागाने ओर्टस कम्युनिकेशनसह काही प्रकरणांमध्ये अर्जदारांकडून स्पष्टीकरण मागितले आहे. हे उल्लेखनीय आहे की गेल्या वर्षी सरकारने डिसेंबरमध्ये भारतीय हवाई क्षेत्रात फ्लाईट सेवांसह समुद्रात मोबाइल फोन सेवेसाठी दिशानिर्देश अधिसूचित केले होते. यानंतर भारती एअरटेल, हग्स कम्युनिकेशन इंडिया आणि टाटानेट सर्विसेजने याच्यासह जुळलेल्या परवान्यासाठी अर्ज केले होते.
 
यानंतर आतापर्यंत हग्स कम्युनिकेशन इंडिया, टाटानेट सर्विसेज आणि भारती एअरटेलची सहायक कंपनी इंडो टेलीपोर्ट्स लिमिटेडला या सेवेचा परवाना (लायसेंस) मिळाला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती