JIO ची धमाल, 'ऑल-इन-वन' योजना, दुसर्‍या नेटवर्कवर 1000 मिनिट कॉलिंग फ्री

सोमवार, 21 ऑक्टोबर 2019 (14:54 IST)
रिलायंस जिओने पुन्हा नवीन ‘ऑल इन वन’ प्लान्सची घो‍षणा केली आहे. नवीन प्लान्स आधीपासून अधिक किफायतशीर आहे. ऑल इन वन प्लानमध्ये ग्राहकांना 2 जीबी डेटा दररोज मिळेल. सोबतच 1000 मिनिट IUC कॉलिंग देखील फ्री मिळेल. 
 
IUC कॉलिंग म्हणजे ग्राहक आता जिओने दुसर्‍या नेटवर्कवर 1000 मिनिट फ्री कॉलिंग करू शकतात. जिओ ते जिओ कॉलिंग आधीपासूनच फ्री आहे. 
 
ऑल इन वन प्लान्स तीन प्रकाराचे आहेत. 222 रुपये, 333 रुपये आणि 444 रुपये च्या प्लान्सची वॅलिडिटी वेगवेगळी आहे. जेथे 222 रुपये च्या प्लानची वॅलिडिटी 1 महिना एवढी आहे. तसेच 333 रुपये आणि 444 रुपये च्या प्लान्सची वॅलिडिटी क्रमशः: 2 आणि 3 महिना आहे. सर्व प्लान्समध्ये 2 जीबी डेटा दररोज मिळेल. सोबतच आपल्याला सर्व प्लान्समध्ये 1000 मिनिट IUC कॉलिंग देखील मिळेल अर्थात 1 महिन्याच्या वॅलिडिटी असणार्‍या 222 रुपये च्या प्लानमध्ये आपण 1000 मिनिट IUC कॉलिंगला 1 महिना वापरू शकाल जेव्हाकी 333 रुपये आणि 444 रुपये असणार्‍या प्लानमध्ये हेच 1000 मिनिट IUC कॉलिंग 2 महिने आणि 3 महिने ग्राहक उपयोग करू शकतील. 
 
काय आहे विशेष
जिओचा सर्वात अधिक विकला जाणारा प्लान 399 रुपयांचा आहे ज्यात 1.5 जीबी डेटा दररोज मिळतो. याची वॅलिडिटी 3 महिन्यांची आहे. जर ग्राहक 3 महिन्याचा प्लान घेऊ इच्छित आहे तर तर 444 रुपयांचा प्लान घेता येईल. या प्लानमध्ये 1.5 जीबी याऐवजी 2जीबी डेटा दररोज मिळतो. अर्थातच ग्राहकाला अतिरिक्त 45 रुपये मध्ये 42 जीबी डेटा अधिक मिळेल. सुमारे 1 रुपये प्रति जीबी या दराने. ही टेलिकॉम इंडस्ट्रीत डेटाची सर्वात कमी किंमत आहे. सोबतच ग्राहकाला 1000 मिनिटांची IUC कॉलिंग देखील फ्री मिळेल. IUC कॉलिंग वेगळ्याने खरेदी केल्यास ग्राहकाला 80 रुपये मोजावे लागले असते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती