गूगलने क्युआर कोड स्कॅनशी संबंधित अ‍ॅप्स काढून टाकली

शुक्रवार, 30 मार्च 2018 (10:45 IST)
गूगलने अलिकडेच काही अ‍ॅप्स प्ले स्टोअरवरुन काढून टाकली आहेत. विशेष म्हणजे काढून टाकलेली अ‍ॅप्स ही क्युआर कोड स्कॅनशी संबंधित आहेत. क्यू आर कोड फ्री स्कॅन, क्यु आर कोड स्कॅनर प्रो, क्यु आर कोड स्कॅन बेस्ट, क्युआर कोड / बार कोड फ्री स्कॅन, क्युआर अँड बारकोड स्कॅनर, स्मार्ट कॉम्पास, स्मार्ट क्युआर स्कॅनर अँड जनरेटर ही अ‍ॅप्स गूगलने प्ले स्टोअरवरुन काढून टाकली आहेत. 

मालवेअरमुळे मोबाईलला होणारी समस्या आपल्यासाठी नवी नाही. मालवेअरचा प्रवेश झाल्यामुळे मोबाईलची सिस्टीम ढासळून पडते. अलिकडेच, नव्या मालवेअरने मोबाईलधारकांना प्रचंड त्रास दिला होता. सोफोलॅब्जने यामागचे कारण असणारे हिडन अ‍ॅड एजे मालवेअर शोधून काढले आहे. काही अ‍ॅप्स डाऊनलोड केल्यानंतर काही वेळातच मोबाईलधारकावर जाहिरातींचा भडिमार करतात. 

या जाहिराती धोकादायक असतात. सोफोलॅब्जच्या म्हणण्यानुसार ही मालवेअर्स जाहिराती आणि वेब पेजीस पॉप अप करतात. यात क्‍लिकेबल लिंकचाही समावेश असतो. त्यामुळे वाईट आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांसाठी जाहिरातींचा महसूल मिळतो. सोफोलॅब्जने अशा अ‍ॅप्सची माहिती गूगलला दिली होती. त्यानंतर सात अ‍ॅप्स प्ले स्टोअरवरुन काढून टाकण्याचा निर्णय गूगलने घेतला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती