व्हॉटसएपवरून ‘ऑटो रिप्लाय'

मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020 (14:58 IST)
मोबाइलमुळे नवीन संवादक्रांती झाली आहे. संदेशाचे वहन करणारे नवीन तंत्रज्ञान जगभरात कमी कालावधीत लोकप्रिय ठरले. मात्र व्हॉटसएपचे आगमन झाल्यानंतर कम्युनिकेशनच्या जगाचा कायापालट झाला आहे.
अलीकडील काळात व्हॉटस्‌एपमध्ये अनेक बदल होत गेले आहेत. याखेरीज व्हॉटसएपसाठी पूरक एप्सही उपलब्ध झाली आहेत. अशाच एका एपमुळे आता व्हॉटसअपवर येणार्या संदेशाला आपोआप उत्तर देणे शक्य झाले आहे. यासाठी ऑटोरिस्पाँडर फॉर व्हॉटसएप आणि ऑटो-रिप्ले फॉर व्हॉटसएपसारख्या एपचा वापर करावा लागेल.
ऑटो रिप्लाय फॉर व्हॉटसअप  
* सर्वात आधी गूगल प्ले स्टोअरवर जा.
* सर्चबारवर ऑटो रिप्लाय फॉर व्हॉटसएपची निवड करा.
* एप इन्स्टॉल केल्यानंतर होम पेजवर व्हॉटसएपवरून ‘ऑटो रिप्लाय' वर जा. याठिकाणी आपल्याला ऑटो रिप्लाय फॉर ऑल मेसेजेसचा पर्याय दिसू लागेल. त्यास इनॅबल केल्यानंतर आपले व्हॉटसएप हे प्रत्येक यूजरच्या मेसेजला आपोआप उत्तर देत राहील.
सर्वांसाठी ऑटो रिप्लायनको असेल तर एक्स्ल्यूड ग्रुप्स ऑर कॉन्टॅक्ट पर्यायावर टॅप करा.
ज्यांना ऑटो टेक्स्ट मेसेज पाठवायचे नाहीत, त्या ग्रुप्स आणि यूजरच्या नावाचा समावेश करू शकता. यानंतर होमपेजवर टेक्स्ट लिहण्यासाठी आपल्याला पर्याय दिसेल. या टेक्स्ट बॉक्समध्ये तुम्हाला यूजरला पाठवायचा आहे तो मेसेज लिहा. होम पेजवरच आपल्याला कीवर्डस टाकण्याचा पर्याय दिसेल. आपण कीवर्डला लिहून त्याचा रिप्लाय देखील टाइप करू शकता. या प्रक्रियेनंतर आपले व्हॉटसअॅप आपोआप रिप्लाय करण्यास सुरुवात करेल.
सतीश जाधव

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती