Amazon ने लॉन्च केले नवे Fire TV Sticks, वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घ्या

शनिवार, 26 सप्टेंबर 2020 (14:18 IST)
अ‍ॅमेझॉनने अमेझन 2020 या वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन केले होतं. या कार्यक्रमात कंपनीने नवीन इको स्मार्ट स्पीकर बाजारात आणले आहेत. तसेच या कार्यक्रमात कंपनी ने नेक्स्ट जनरेशनचे फायर टीव्ही डिव्हाईस देखील बाजारपेठेत आणले आहेत. या मध्ये फायर टीव्ही स्टिक आणि फायर टीव्ही लाइटचा समावेश आहे. भारतात या फायर टीव्ही डिव्हाईसच्या किमती देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. 
 
नेक्स्ट जनरेशन फायर टीव्ही स्टिक्सची किंमत 3999 रुपये आहे, तर फायर टीव्ही स्टिक लाइटची किंमत 2999 रुपये आहे. हे दोन्ही डिव्हाईस आज पासून भारतात प्री-ऑर्डर साठी उपलब्ध आहेत.
 
वैशिष्ट्ये - वैशिष्ट्य बाबत सांगायचे झालेस तर फायर टीव्ही स्टिक 1.7 गिगाहर्टझ, क्वाड-कोर प्रोसेसर सह येते, कंपनीचे म्हणणे आहे की नवीन फायर स्टिक मागील जनरेशन च्या तुलनेत 50 टक्क्यांनी अधिक सामर्थ्यवान आहे आणि त्याच्या तुलनेत 50 टक्क्यांनी कमी ऊर्जा वापरतं. हे एचडीआर कम्पॅटिबिलिटी सह 1080p मध्ये 60fps वर जलद स्ट्रीमिंग देतं. यामध्ये ड्युअल -बॅण्ड, ड्युअल -ऐटींना, वाई-फाई आहे जी स्टेबल स्ट्रीमिंग आणि ड्रोप्ड कनेक्शनसाठी 5 गिगाहर्टझ नेटवर्कला समर्थन देतं.
 
फायर टीव्ही स्टिक लाइट - 
फायर टीव्ही स्टिक लाइट हा एक परवडणारा व्हेरियंट आहे. याची किंमत 2,999 रुपये आहेत. या मध्ये फुल एच डी कन्टेन्टची स्ट्रीमिंग होऊ शकते. अ‍ॅमेझॉनचे मत आहे की फायर टीव्ही स्टिक लाइट मागील जनरेशन च्या फायर टीव्ही स्टिक च्या तुलनेत 50 टक्के अधिक सामर्थ्यवान आहे. या मध्ये एचडीआर सपोर्ट दिले आहेत आणि हे अलेक्सा व्हॉईस रिमोट लाइट सह येतो, एक नवीन रिमोट जे आपल्याला शोध घेण्यास, लॉन्च करण्यास आणि नियंत्रित करण्यासाठी व्हॉईस वापरण्याची परवानगी देतो.
 
फायर टीव्हीच रिडिझाईन -
कंपनी ने अ‍ॅमेझॉन फायर टीव्हीच्या यूजर इंटरफेसला देखील नवीन बदल दिला आहे. कंपनीने यूजर्ससाठी मुख्य मेनूला सेंटरमध्ये ठेवले आहेत. यूजर्स आता आपल्या आवडत्या स्ट्रीमिंग सेवांमध्ये थेट जाऊ शकतात किंवा त्या अ‍ॅपवर कंटेट स्क्रोल करू शकता. जी जलद प्लेबॅक सुरू करू शकतात. कंपनीचे म्हणणे आहे की हा एक नवीन शोधचा अनुभव आहे. जे यूजर्सला चित्रपट, टीव्ही शो आणि बरंच काही शोधण्यासाठी सुलभ करत. 
नवीन डिव्हाईस व्हॉईस कंट्रोल सह येतात. 
 
यूजर्स शो आणि चित्रपटाच्या ब्राउजिंग करण्यासाठी "अलेक्सा, लायब्ररीवर जा" असे ही म्हणू शकतात. कंपनीने यूजर्स प्रोफाइल देखील सादर केली आहे. जी घरातील सहा सदस्यांसाठी एक वैयक्तिक अनुभव प्रदान करत. अमेझॉनचे म्हणणे आहे की रीडिजाइन्ड फायर टीव्ही एक्स्पीरिएंस याच वर्षी अद्यतनांद्वारे दिले जाणार. हे अद्यतन ग्लोबली असणार. म्हणजे आता भारताच्या युजर्सला एक नवीन इंटरफेस मिळेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती