2.5 कोटी एंड्रॉयड फोनमध्ये शिरला Agent Smith वायरस, आपल्या फोनमधून कसे दूर कराल

शुक्रवार, 12 जुलै 2019 (12:23 IST)
एंड्रॉयड स्मार्टफोनमध्ये सिक्योरिटीबद्दल नेहमीच धोका असतो. सारखे एंड्रॉयड फोनमध्ये मैलवेयर किंवा वायरस बघायला मिळतात. आता सिक्योरिटी फर्म चेकप्वाइंटने आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की जगभरातील 2.5 कोटी एंड्रॉयड फोन एजेंट स्मिथ (Agent Smith) मैलवेयरच्या चपेट मध्ये आहे. रिपोर्टमध्ये असे देखील सांगण्यात आले आहे की फक्त भारतातील 1.5 कोटी फोन या वायरसमुळे प्रभावित झाले आहे. हा वायरस एंड्रॉयड स्मार्टफोन्समध्ये यूजर्सच्या न कळत पोहोचतो आणि खास बाब म्हणजे गूगलशी निगडित एपच्या माध्यमाने फोनमध्ये येतो. हा एप यूजर्सच्या फोनमध्ये आधीपासून असणार्‍या एपला वायरस असणार्‍या एपमध्ये बदलत आहे. या   मैलवेयरच्या पकडमध्ये भारताशिवाय पाकिस्तान, बांगलादेश, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेपर्यंतचे यूजर्स आहे.
 
तुमच्या फोनमध्ये काय काय करू शकतो एजेंट स्मिथ वायरस?
 
जर हा वायरस तुमच्या फोनमध्ये पोहोचला आहे, तर तो तुमच्या परवानगीशिवाय डिवाइसचे पूर्ण ऍक्सेस घेऊन घेतो. जसे कॅमेरा, लोकेशन, कॉल, मेसेज इत्यादीचे ऍक्सेस त्याच्याजवळ असतील. त्यानंतर हा एप तुमच्या फोनमध्ये बर्‍याच प्रकारचे आर्थिक फसवणूक असणार्‍या जाहिरात दाखवत असेल. या जाहिरातींच्या मदतीने हा वायरस तुमची वित्तीय माहिती देखील चोरी करू शकतो. या एपची खास गोष्ट अशी आहे की याचा आयकॉन तुम्हाला दिसणार नाही. अशात तुम्हाला हे कळत नही की हा फोन तुमच्या एपमध्ये आहे की नाही. हा एप तुमच्या फोनमध्ये असणार्‍या व्हाट्सएप आणि गूगल सारख्या लोकप्रिय एपला रिप्लेस करू शकतो.
 
थर्ड पार्टी एपच्या माध्यमाने फोनमध्ये एंट्री
 
त्याशिवाय हा एप युजर्सला प्ले-स्टोअरहून ड्रॉपर एप जसे 9Apps ला डाउनलोड करवतो. अशा एप्सला डाउनलोड करण्यासाठी असहाय्य करवून तो फ्री गेम एप्स, एडल्ट आणि  फ्री ऑफर्स सारख्या जाहिरात दाखवतो. 9एप्स जसे थर्ड पार्टी एप स्टोअरहून डाउनलोड होणारे एप्स इनक्रिप्टेड असतात आणि यात आधीपासूनच वायरस उपस्थित असतात. यानंतर तुमच्या फोनमध्ये येणारे एप्स यूजर्सच्या फोनमध्ये उपस्थित व्हाट्सएप, एमएक्स प्लेयर, शेयरइट सारख्या लोकप्रिय एपची चाचणी करतो. यानंतर जसे की आधीपासूनच निश्चित करण्यात आलेला एखादा एप युजर्सच्या फोनमध्ये मिळतो तर वायरस वास्तविक एपला त्याच नावाने बदलून देतो. अशात लोकांना माहीतच पडत नाही की ते वास्तविक एप वापरत आहे की वायरस असणार्‍या एपला. जर तुमच्या फोनमध्ये whatsapp, lenovo.anyshare.gps, mxtech.videoplayer.ad, jio.jioplay.tv, jio.media.jiobeats, jiochat.jiochatapp, jio.join, good.gamecollection, opera.mini.native, startv.hotstar, meitu.beautyplusme, domobile.applock, touchtype.swiftkey, flipkart.android, cn.xender, eterno आणि truecaller सारखे एप उपस्थित आहे तर शक्य आहे की एजेंट स्मिथ एप तुमच्या फोनमध्ये पोहोचला आहे. या एपाने हिंदी, अरबी, रशिया आणि इंडोनेशिया बोलणार्‍या लोकांवर सर्वात जास्त निशाणा साधला आहे.
 
तुमच्या एंड्रॉयड स्मार्टफोनमधून कशे हटवाल एजेंट स्मिथ वायरस
फोनच्या सेटिंग्समध्ये जा
Apps किंवा अॅप्लिकेशन मॅनेजरवर क्लिक करा
आता खालची स्क्रोल करून बघा
आता अशा कोणत्या ही एप को अन-इंस्टॉल करा ज्याला आपण ओळखत नाही किंवा त्याला तुम्ही डाउनलोड केलेले नाही आहे.
जर कुठलेही संशयास्पद एप दिसत नाही तर नुकतेच इंस्टॉल केलेले सर्व एप्सला अन-इंस्टॉल करून द्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती