वानखेडेमध्ये 18 हजार मुलांनी मुंबई इंडियन्सचे मनोबल वाढवले

सोमवार, 8 एप्रिल 2024 (13:14 IST)
• नीता अंबानी आणि सचिन तेंडुलकर यांनी मुलांसाठी 'शिक्षण आणि खेळ सर्वांसाठी' उपक्रमावर भाषण केले
• ‘सर्वांसाठी शिक्षण आणि क्रीडा’ उपक्रमाने 2 कोटी 20 लाखांहून अधिक मुलांच्या आयुष्याला स्पर्श केला आहे.
 
मुंबई इंडियन्सने आयपीएलमधील या हंगामातील  पहिला विजय नोंदवला. मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा हा विजयही खास होता कारण वानखेडे स्टेडियमवर मुंबईच्या कानाकोपऱ्यातून 18,000 मुले मुंबई इंडियन्स संघाचा जल्लोष करत होती. रिलायन्स फाऊंडेशनच्या 'एज्युकेशन अँड स्पोर्ट्स फॉर ऑल' अर्थात ईएसए (ESA) या उपक्रमाशी संबंधित असलेल्या या मुलांना या क्रिकेट सामन्याचा आनंद घेण्यासाठी खास आमंत्रित करण्यात आले होते. या रोमांचक विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या मालक नीता एम अंबानी यांनी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरशी संवाद साधला.
 
एज्युकेशन अँड स्पोर्ट्स फॉर ऑल इनिशिएटिव्ह या विषयावर नीता अंबानी म्हणाल्या, “आज वेगवेगळ्या  एनजीओ (NGO )मधील 18,000 मुले स्टँडवर सामना पाहत आहेत. माझा विश्वास आहे की खेळांमध्ये भेदभाव केला जात नाही आणि प्रतिभा कुठूनही येऊ शकते. यातील एक मूल खेळाच्या शिखरावर पोहोचण्याची शक्यता आहे. मला आशा आहे की ते अनेक आठवणी आणि त्यांच्या स्वप्नांवर विश्वास ठेवण्याची ताकद घेऊन परततील.”
 
सचिन तेंडुलकर त्यांच्या वानखेडे स्टेडियमच्या पहिल्या आठवणी आणि त्यांना  अजूनही सर्व काही कसे आठवते याबद्दल बोलले . सचिन म्हणाले , “मुले माझ्यासाठी भविष्य आहेत. उद्या चांगला हवा असेल तर आजच काम करावे लागेल. श्रीमती अंबानी यांच्या मार्गदर्शनाखाली रिलायन्स फाऊंडेशनने जगभरातील अनेक मुलांना संधी उपलब्ध करून दिली आहे. शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही त्याअशीच कामगिरी करत राहतील, अशी आशा आहे.
 
ईएसए(ESA )बद्दल नीता अंबानी म्हणाल्या, “आम्ही 14 वर्षांपूर्वी ईएसए(ESA ) सुरू केला होता आणि तो भारतभरात 2 कोटी 20 लाख मुलांपर्यंत पोहोचला आहे. सचिनप्रमाणेच माझेही मत आहे की, प्रत्येक मुलाला खेळण्याचा आणि शिक्षणाचा अधिकार असला पाहिजे. मुले खेळाच्या मैदानावर जितके शिकतात तितकेच ते वर्गात शिकतात. खेळ त्यांना शिस्त आणि कठोर परिश्रम शिकवतो आणि त्याहीपेक्षा ते त्यांना विजय-पराजय कसे स्वीकारायचे हे शिकवते. "ईएसए भारतातील दुर्गम खेडे आणि शहरांमध्ये या लहान मुलांसाठी लाखो दरवाजे उघडते."
 
ईएसए(ESA )ची सुरुवात नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स फाऊंडेशनच्या पुढाकाराने झाली होती. रिलायन्स फाऊंडेशनच्या व्यापक 'व्ही  केअर' दृष्टीकोनातून चालत, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील विविध उपक्रम वर्षभर ईएसए(ESA )च्या माध्यमातून राबवले जातात. रिलायन्स फाऊंडेशनने संपूर्ण भारतातील 2 कोटी 20 लाखांहून अधिक मुलांच्या जीवनावर परिणाम केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती