आयपीएलला मिळाला नवीन स्पॉन्सर, विवो ने केला करार रद्द

मंगळवार, 25 ऑगस्ट 2020 (16:24 IST)
आयपीएलमध्ये (IPL)असोसिएट स्पॉन्सर फ्युचर ग्रुप होती. पण काल या कंपनीने आयपीएलची स्पॉन्सरशिप काढून घेतली होती. त्यामुळे आयपीएलला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात होते. पण आता आयपीएलसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण ही स्पॉन्सरशिप घेण्यासाठी एका दिवसातच एक कंपनी तयार झाली आहे. या कंपनीने आयपीएलबरोबर तीन वर्षांचा करार केल्याचेही म्हटले जात आहे.

एका स्पर्धेसाठी बरेच स्पॉन्सर असतात. विवो ही कंपनी आयपीएलची मुख्य स्पॉन्सर होती आणि आता ही जागा ड्रीम इलेव्हनने घेतली आहे. पण आयपीएलमध्ये असोसिएट स्पॉन्सर फ्युचर ग्रुप होती. गेल्या पाच वर्षांपासून ही कंपनी आयपीएलबरोबर जोडलेली होती. पण आता अचानक या कंपनीने आयपीएलबरोबरचा आपला करार रद्द केला आहे. आयपीएलनेही आपल्या वेबसाईटवरून या कंपनीचे नाव काढून टाकले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती