प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी आज हैदराबाद-पंजाब भिडणार

शनिवार, 24 ऑक्टोबर 2020 (07:50 IST)
सलग तीन विजयांनी पुन्हा एकदा विजयीपथावर परतलेल्या पंजाबचा संघ व मागील सामन्यात मोठा विजय प्राप्त केलेला हैदराबादचा संघ आयपीएलमध्ये आज (शनिवारी) आपापले विजयी अभिमान कायम ठेवण्याच्या उद्देशाने एकमेकांचा सामना करतील. पंजाब व हैदराबादची स्थिती एकसारखीच आहे. या दोन्ही संघांचे 10 सामन्यातून 8 गुण झाले आहेत. मात्र, हैदराबाद चांगल्या धावगतीमुळे गुणतालिकेत आपल्या प्रतिस्पर्धी संघापेक्षा एका पारीने पाचव्या स्थानावर आहे. प्ले ऑफमध्ये आपली जागा पक्की करण्यासाठी या दोन्ही संघांना आपले उर्वरित सामने जिंकावे लागणार आहेत.
 
पंजाबसाठी स्पर्धेची सुरुवात चांगली झालेली नव्हती. मात्र, मागील तीन सामन्यांमध्येप या संघाने चांगली कामगिरी केली आहे. राहुलच्या नेतृत्वाखालील संघ अव्वल चार संघांमध्ये प्रवेश करण्यासाठी आपले विजयी अभिमान कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. पंजाबची फलंदाजी सुरक्षित हातांमध्ये आहे.
 
कर्णधार राहुल, मयंक अग्रवाल, ख्रिस गेल व निकोलस पुरन चांगली कामगिरी करत आहेत. मात्र, ग्लेन मॅक्सवेलचा फॉर्म  चिंतेचा विषय आहे. जिमी निशमच्या आगमनामुळे पंजाबची फलंदाजी व मोहम्मद शमीच्या नेतृत्वाखालील गोलंदाजीला काही प्रमाणात मजबुती मिळाली आहे. हैदराबादलाही प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी आपले उर्वरित चारही सामने जिंकावे लागतील. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील संघ आता प्ले ऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. जेसन होल्डरच्या समावेशाने हैदराबादची गोलंदाजी मजबूत झाली आहे. या अष्टपैलू खेळाडूने मागील सामन्यात 33 धावांच्या मोबदल्यात 3 गडी बाद केले होते. मात्र, त्यांच्या संघातील युवा खेळाडू प्रियम गर्ग, अब्दुल समद व टी नटराजन यांनी अधिक जबाबदारी घेण्याच गरज आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती