US Elections 2020: अमेरिकेत आज राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान, 24 कोटी मतदारांचा समावेश, ट्रम्प पुन्हा सत्तेत परततील का?

मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020 (08:05 IST)
अमेरिकेत होणार्‍या अध्यक्षीय निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. यावेळी स्पर्धा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांच्यात आहे. अमेरिकेत मतदानाच्या वेळेसंदर्भात बोलताना भारतीय वेळेनुसार मंगळवारी संध्याकाळी 4.30 वाजेपासून मतदान सुरू होईल. कारण भारत आणि अमेरिका यांच्यात सुमारे 10.30 तासांचा फरक असतो.
 
या वेळी अमेरिकेच्या वेळेत सकाळी 6 वाजल्यापासून मतदान सुरू होईल आणि रात्री 9 वाजेपर्यंत संपेल. अमेरिकेची सर्व 50 राज्ये एकत्र मतदान करतील. यावेळी सुमारे 24 कोटी मतदार मताधिकार वापरतील. निवडणूक सर्वेक्षणात असे म्हटले आहे की मतदारांनी आधीच मतदान केले आहे अशा महत्त्वाच्या राज्यात डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो. बिडेन पुढे आहेत, तर ट्रम्प यांना महत्त्वपूर्ण बढ़त मिळणार आहे जेथे मतदान अजून बाकी आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती