इस्लामाबादमध्ये भारतीय दूतावासाचे २ अधिकारी बेपत्ता

सोमवार, 15 जून 2020 (16:00 IST)
पाकिस्तानमधील इस्लाबाद येथे भारतीय दूतावासात कार्यरत असलेले दोन अधिकारी बेपत्ता झाले आहेत.  इस्लामाबादमध्ये भारतीय दूतावासाचं कार्यालय असून, सोमवारी दोन्ही अधिकारी बेपत्ता झाले. या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयानं तातडीनं पाकिस्तानकडे हा मुद्दा उपस्थित केला आहे.याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भात ट्विट केलं आहे. 
 
याआधी भारताने ३१ मे रोजी पाकिस्तानी उच्चायोगातील दोन कर्मचाऱ्यांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली होती. चोरलेल्या दस्तावेजांची देवाणघेवाण करताना पाकिस्तानी उच्चायोगातील तीन कर्मचाऱ्यांना रविवारी अटक करण्यात आली होती. लष्करी गुप्तचर यंत्रणा आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही मोठी कारवाई केली होती. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती