काय आहे 'Howdy Modi', येथे एका मंचावर असतील पीएम मोदी आणि डोनाल्ड ट्रंप

सोमवार, 16 सप्टेंबर 2019 (12:34 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात अमेरिकेत जाणार आहे. आपल्या नवीन कार्यकाळातील मोदी यांच्या हा पहिला अमेरिका दौरा असेल. तेथे ते  संयुक्त राष्ट्र महासभा (UNGA - United Nations General Assembly)ला संबोधित करणार आहे. पण यूएनजीएमध्ये जाण्याअगोदर पीएम मोदी आधी अमेरिकेतील टेक्सासच्या ह्यूस्टन शहरात जाणार आहे.  
 
ह्यूस्टनच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. असे म्हटले जात आहे की येथे 50 हजारांपेक्षा जास्त लोक मोदी यांना ऐकण्यासाठी येणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप देखील या कार्यक्रमात भाग घेणार आहे अशी आशा   व्हाईट हाउसने व्यक्त केली आहे. ते देखील येथे सामील होणार आहे.  
अमेरिकेत पीएम मोदी यांच्या हा तिसरा मोठा कार्यक्रम असेल. या अगोदर ते अमेरिकेत 29 सप्टेंबर 2014 रोजी मेडिसन स्क्वायर आणि 27 सप्टेंबर  2015 रोजी सिलिकॉन वेलीमध्ये देखील मोठ्या कार्यक्रमात भाग घेतला आहे. यंदा 22 सप्टेंबर रोजी ह्यूस्टनचे NRG स्टेडियममध्ये ते संबोधन करणार आहे. याबद्दल अमेरिकेत पीएम मोदी यांच्यासाठी हाउडी मोदी (Howdy Modi) चा वापर करण्यात येत आहे.  
 
तुम्हाला या शब्दांचा अर्थ माहीत आहे का?  
 
हाउडी मोदीचा अर्थ सांगण्याआधी तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे की हा कार्यक्रम का खास आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमाने भारत आणि अमेरिकेचे संबंध अधिक घट्ट होण्याची गोष्ट सांगण्यात येत आहे. येथे दोन्ही देशांचे संबंध, संस्कृती आणि व्यापारावर चर्चा होईल.   
आता तुम्हाला सांगायचे म्हणजे हाउडी मोदीचा अर्थ. हाउडी शब्द शॉर्ट फॉर्मच्या रूपात वापर करण्यात येत आहे. याचा पूर्ण अर्थ -  हाऊ डू यू डू (How do you do), अर्थात तुम्ही कसे आहात ? दक्षिण-पश्चिम अमेरिकेत अभिवादनासाठी या शब्दाचा वापर केला जातो. यामुळेच नरेंद्र मोदी यांच्या अभिवादनासाठी येथे हाउडी मोदी (Howdy Modi) चा प्रयोग होत आहे. अर्थात हाऊ डू यू डू मोदी? 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती