पाकिस्तानात भीषण विमान अपघात, कराची एअरपोर्ट जवळीक रहिवासी भागात विमान कोसळलं

शुक्रवार, 22 मे 2020 (16:49 IST)
पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स विमानाला भीषण अपघात झाला आहे. लाहोरहून कराचीला जाणारं एक पॅसेंजर विमान एअरबस ए-320 कराचीजवळ क्रॅश झाले. काही तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याची माहिती आहे. या विमानात 90 जण असल्याची माहीती मिळत आहे. या अपघातात कोणत्याही व्यक्तीची जिवंत राहण्याची आशा फार कमी आहे.
 
अपघातमागचं कारण अद्याप स्पष्ट नाही. विमानाच्या लँडिंगच्या मिनिटभर आधी अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. विमान कराची विमानतळापासून काही अंतरावर असलेल्या जिन्ना गार्डन परिसरातील मॉडल कॉलोनीमध्ये क्रॅश झाले. विमान कोसळताच त्यानं पेट घेतला. या अपघातात मॉडेल टाऊन परिसरातील 4-5 घरे जळून खाक झाली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती