OMG, 12 दिवसात 150 हून अधिक महिलांवर बलात्कार

संयुक्त राष्ट्राच्या तीन एजन्सी प्रमुखांप्रमाणे दक्षिण सूडान येथे मागील 12 दिवसात 150 हून अधिक महिला आणि मुलींवर दुष्कर्म किंवा इतर लैंगिक अत्याचार झाले आहेत. यासाठी एजन्सी मदतीसाठी पुढे आल्या आहेत.
 
संराची बाल एजन्सी युनिसेफची प्रमुख हेनरीट्टा फोर, संरा मदत प्रमुख मार्क लोकॉक आणि संरा जनसंख्या कोष निदेशक नतालिया कानेम यांनी एका वक्तव्यात म्हटले की अनेक गणवेश धार्‍यांसह सशस्त्र व्यक्तींनी उत्तरी शहर बेनटियूजवळ हल्ला केला.
 
एजन्सीने हल्ल्याची निंदा केली आणि दक्षिणी सूडानच्या अधिकार्‍यांना आरोपींना शिक्षा व्हावी हे सुनिश्चित करायला सांगितले.
 
डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स (एमएसएफ) यांनी मागील आठवड्यात म्हटले होते की आंतरराष्ट्रीय मदत एजन्सीद्वारे स्थापित आपत्कालीन अन्न वितरण केंद्र जाताना 125 महिला आणि मुलींवर बलात्कार झाला.
 
संयुक्त राष्ट्र महासचिव एंतोनियो गुतारेस यांनी हल्ल्याची निंदा केली आहे. त्यांनी म्हटले की अशा धक्कादायक घटनांनंतर कळून येतंय की दक्षिणी सूडनच्या नेत्यांद्वारे शांती स्थापित करण्याच्या प्रतिबद्धतेनंतर देखील नागरिकांना आणि विशेष करून महिला व लहान मुलांसाठी कशा प्रकाराची भीतिदायक स्थिती आहे.
 
संयुक्त राष्ट्राने आपल्या वक्तव्यात म्हटले की बळी पडलेल्यांमध्ये 20 टक्क्यांहून अधिक तर मुले आहेत. आणि तिन्ही एजन्सीप्रमाणे तर वास्तविक बलात्कार संख्या अधिक असून अनेक बातम्या बाहेर आलेल्याच नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती