जापान / 28% महिलांनी मुलांसाठी सोडली नोकरी, कारण डे केअरमध्ये त्यांचे नाव वेटिंग लिस्टमध्ये आहे

मंगळवार, 9 जुलै 2019 (11:40 IST)
जापानमध्ये प्रत्येक महिन्यात 25 ते 30 दंपती डे केअर सुविधा न मिळाल्याने त्रस्त आहेत. किमान 28% महिलांना मुलांचे संगोपणासाठी नोकरी सोडावी लागली आहे. अजूनही किमान 50 हजार मुल डे केअरच्या वेटिंग लिस्टमध्ये आहे. या समस्येपासून सुटकारा मिळवण्यासाठी महिलांनी समोर येऊन आपल्या हक्कासाठी लढणे सुरू केले आहे.  
 
सांगायचे म्हणजे जपानमध्ये डे केअर सरकार द्वारे संचलित केले जातात. म्हणून सर्वांना सुविधा मिळत नाही. 43 वर्षांची ताओ अमानो ने अशा आई वडिलांची मदत करण्यासाठी मिराओ संस्था सुरू केली आहे. ताओ देखील कामकरी स्त्री आहे, जेव्हा तिच्या मुलांना तीन सेंटर्स ने ठेवण्यासाठी नकार दिला तेव्हा त्यांनी ही संस्था सुरू केली.  
 
ताओच्या संस्थेने हैशटेग आय वॉन्ट डे केयर अभियान चालवले आहे. यात आई वडिलांना डे केयर द्वारे देण्यात आलेले रिजेक्शन लेटर दाखवावे लागतात. ज्याने सरकारवर दाब कायम करण्यात ते यशस्वी होतील. वर्षातून ऐकवेळा देशातील मोठ्या नेत्यांना बोलावून समस्येबद्दल सांगण्यात येते.  
 
असेच अभियान स्थानीय नेता युका ओगाता चालवत आहे. त्यांना मुलांसोबत कुमामोतो काउंसिलमध्ये येण्यास रोखले होते. त्यांनी अभियान चालवून काउंसिलच्या नियमांमध्ये बदल करवला. आता ती घरून काम करू लागली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती