फ्रान्सचा जीडीपी 8 टक्के घटणार

गुरूवार, 16 एप्रिल 2020 (15:17 IST)
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे फ्रान्सच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) या वर्षी आठ टक्के   घट होण्याचा अंदाज आहे.

फ्रान्समध्ये 11 मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. त्याचा परिणाम जीडीपी घटण्यात होणार असल्याचे फ्रान्सचे अर्थमंत्री ब्रुनो ली मायर यांनी सांगितले. ली मायर यांनी यापूर्वी देशाचा जीडीपी सहा टक्क्यांनी घटणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र, हा अंदाज एक महिना लॉकडाउनच्या काळावर अवलंबून होता. दोन महिने लॉकडाउनचा काळ झाला आहे. फ्रान्सच्या जीडीपीत या वर्षी 8 टक्के घट होण्याचा अंदाज ली मायर यांनी वर्तवला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती