इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख रुपये

शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018 (11:03 IST)
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून आपल्या खजिन्यात काही रुपये अजून एकत्र केले आहे. काही दिवसांअगोदर पंतप्रधान निवासच्या मोटार कार्सचा लिलाव करून काही रक्कम जमा करण्यात आले होते.    
 
या सर्व म्हशी पंतप्रधान निवासात ठेवलेल्या होत्या जेथे नवाझ शरीफ आणि त्यांचा कुटुंब राहत होता.  
 
पण पाकिस्तानचे नवीन पंतप्रधान इम्रान खान यांनी खर्चांमध्ये काटछाट केल्याचे आपल्या निर्णयानंतर त्यांनी या म्हशींचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता.  
 
इम्रान खानचे निवडणुकीत झालेला विजय त्यांनी दिलेले भ्रष्टाचार खात्मा करण्याचे वचन हे महत्त्वाचा राहिले आहे.  
 
पदावर बसल्यानंतर त्यांनी खर्चांमध्ये काटछाट करण्यासाठी बरेच पाऊल उचलले आहे पण आलोचकांचे म्हणणे आहे की हा फक्त दिखावा मात्र आहे.  
 
म्हशींच्या लिलावातून किमान 13 लाख 78 हजार एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे, या अगोदर बुलेटप्रूफ कारींचा लिलाव करून 4 कोटी 35 लाख रुपयांची कमाई झाली होती.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती