जिवंत आहे बगदादी, 5 वर्षांमध्ये पहिल्यांदा दिसला व्हिडिओमध्ये

मंगळवार, 30 एप्रिल 2019 (10:25 IST)
कुख्यात दहशतवादी संगटन इस्लामिक स्टेटचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी जिहादी संगटन द्वारे सोमवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये 5 वर्षांनंतर प्रथमच दिसला. 
 
अद्याप हे स्पष्ट झाले नाही की हा व्हिडिओ केव्हा काढण्यात आला आहे, या व्हिडिओची सत्यता पडताळली जात आहे. या व्हिडिओमध्ये बगदादी पूर्व सिरीयासंदर्भात बोलताना दिसतोय.  
 
एका गादीवर बसून आणि 3 लोकांना संबोधित करत बगदादीने म्हटले की बागूजची लढाई संपली आहे. व्हिडिओत या तिन्ही लोकांचे चेहरे चांगल्या प्रकारे दिसत नाही आहे.
 
सप्टेंबर 2017नंतर इसिसच्या म्होरक्याचं पहिलं  रेकॉर्डिंग समोर आलं होतं. इसिसनं 2014मध्ये सिरीया आणि इराकचा मोठा भाग ताब्यात घेतला होता. तसेच स्वतःला या भागातील खलिफा घोषित केलं होतं. परंतु आता त्यांना या दोन्ही देशांतून पळवून लावण्यात आलं आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती