काय म्हणता, चीनमध्ये 17 दिवसाच्या मुलीची कोरोनावर यशस्वी मात

गुरूवार, 12 मार्च 2020 (10:00 IST)
चीनमध्ये 17 दिवसाच्या मुलीने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. 5 फेब्रुवारी 2020 रोजी या चिमुरडीचा चीनमधील वुहान येथे जन्म झाला होता. तिचा जन्म झाला तेव्हा तिला तिच्या आईमुळे कोरोनाची लागण झाली होती. पण कोणत्याही औषधाविना तिचा कोरोना बरा झाल्यामुळे सर्वांसाठी ही चिमुरडी चर्चेचा  विषय आहे.  चिमुरडी जन्मताच मृत्यूला परतवण्यासाठी लढा देत होती. अवघे काही तास आधी जन्मलेली चिमुरडी जगेल की नाही याची भीती डॉक्टरांच्या मनात होती. पण डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले.
 
चिमुरडीला श्वास घेण्यात अडचण होत असल्यानं जन्मताच डॉक्टरांनी तिला निगराणीखाली ठेवले. जास्त त्रास होऊ लागल्यानं कोणत्याही प्रकारची औषधं तिला दिली नाही आणि अखेर 15 दिवसानंतर तिला श्वास घेण्यात कोणतीही अडचण आली नाही. 17 दिवसाची ही चिमुरडी कोणत्याही उपचाराविना वाचली आणि 2 दिवसांनंतर चिमुरडीला डॉक्टरांनी डिस्चार्जही दिला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती