होळी विशेष उपाय : कणकेचे हनुमान करतील प्रत्येक इच्छा पूर्ण

सोमवार, 7 मार्च 2022 (08:14 IST)
होळीवर रामभक्त हनुमानाची कणकेची प्रतिमा आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकते. आपलं संकट दूर शकते.
 
होळीच्या दिवशी (पौर्णिमा) सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ ताटात तेल, बेसन आणि उडीद डाळीची पीठ मळून हनुमानाची मूर्ती तयार करावी. मूर्ती तयार करून पूर्ण श्रद्धापूर्वक प्राण-प्रतिष्ठा करावी.
 
प्रतिमेसमोर तेल आणि तुपाचा दिवा लावावा आणि गोड मालपुए, दुधाने तयार मिठाई किंवा इमरती व इतर वस्तूंचा नैवेद्य दाखवावा. नंतर 27 विड्याची पाने लावून हनुमानाला अर्पित करावा. 108 वेळा या मंत्राचा जप करावा-
 
मंत्र-
नमो भगवते आंजनेयाय महाबलाय स्वाहा
 
या नंतर हनुमानाची आरती करून मनोकामना स्मरण करावं. मूर्ती विसर्जित करावी. एखाद्या ब्राह्मणाला भोजन करवावं आणि दान देऊन सन्मानाने विदा करावं. लवकरच बजरंगबली प्रत्येक मनोकामना पूर्ण करतात. सुख- समृद्धी आणि स्नेहाचा आशीर्वाद देतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती