चातुर्मास विषयी श्री गोंदवलेकर महाराजांचे मत-

रविवार, 5 ऑगस्ट 2018 (00:11 IST)
श्रावण महिना आला की लोकं ठरवतात चातुर्मास पाळायचा. 
महाराज म्हणतात " माझ्या माणसांने चातुर्मास कसा पाळावा?
तर आपल्यातला एक दुर्गुण पकडावा. 
तो चार महिने सोडण्याचा प्रयत्न करावा.
समजा,आपण खूप रागावता. तर चार महिने रागावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करा. बरं...
आपण  कुठे नोकरीत वरच्या पदावर असाल, तर आपल्या हाताखालच्या लोकावर रागवावं लागत असेल .!
आई वडील असाल तर मुलांवर रागवावं लागत असेल अशा प्रसंगी  .
रागवताना राग फक्त चेहऱ्यावर असू दे,मनातून  नको ! आतून मन शांत असावे, राग हा सोंगाचा राग असावा 
जसे चातुर्मासात लोकांकडे गेल्यावर त्यांनी काही खायला दिले तर आपण म्हणतो नां? 
या पदार्थात कांदा नाही नां? माझा चातुर्मास आहे! जसा कांदा,लसूण अध्यात्मानं वज्र्य ठरवला आहे, असं मानतात
तसेच, जेव्हा जेव्हा  रागाचा प्रसंग येईल , तेव्हा तेव्हा  आपल्या  मनाला आठवण करून द्यावी की आपला चातुर्मास आहे ! राग आपल्यासाठी वर्ज्य आहे ! आपल्याला रागवायचं नाही ! असा नियम करून प्रथम पहिले चार महिने राग सोडावा ,
मग जर असा दुर्गुण पहिले चार महिने सोडता आला, तर तो वर्षभर सोडण्याचा प्रयत्न करावा 
वर्षभर साधलं तर जन्मभर सोडावा ! 
असा चातुर्मास करणाऱ्या माझ्या माणसान कांदा खाल्ला काय आणि न खाल्ला काय सारखाच!

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती