बुधवारी गणपतीचे 5 उपाय, मिळेल धन, वाढेल व्यवसाय...स्वप्ने पूर्ण होतील

बुधवार म्हणजे गणपतीची आराधना करण्याचा विशेष दिवस. बुधवारी करण्यात येणारे असे उपाय ज्यामुळे आर्थिक लाभ तर होण्याची शक्यता असून प्रगतीचा मार्ग दिसू लागेल तर येथे जाणून घ्या 5 सोपे उपाय:
 
1. बुधवारी गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करणे फलदायी ठरेल. तसेच महिन्यातून येणार्‍या दोन्ही चतुर्थी तिथीला देखील पाठ करणे शुभ ठरेल.
 
2. या व्यतिरिक्त आपण गणपती मंदिरात जाऊन दूर्वा अर्पित कराव्या आणि लाडू किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवावा.
 
3. बुधवारी किन्नरांना पैसे दान करावे. आणि त्यांच्याकडून काही पैसे आशीर्वाद म्हणून घ्यावे. त्यांनी दिलेले पैसे पूजा स्थळी ठेवून धूप-उदबत्ती दाखवावी. नंतर हिरव्या कपड्यात गुंडाळून धन ठेवत असलेल्या जागी ठेवून द्यावे. याने बरकत येते.
 
4. आपण तांत्रिक उपाय करू इच्छित असल्यास बुधवारी 7 कवड्या घ्याव्या. यासह मूठभर अख्खे मूग घ्यावे आणि दोन्ही वस्तू हिरव्या कपड्यात गुंडाळून गुपचुप एखाद्या मंदिराच्या पायर्‍यांवर ठेवून यावे. याबद्दल कोणालाही सांगू नये. याची चर्चा करू नये.
 
5. बुधवारी सव्वा पाव मूग उकळून त्यात तूप आणि साखर मिसळून गायीला खाऊ घालावे. याने लवकरच कर्जापासून मुक्ती मिळते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती