विष्णू पुराणाप्रमाणे या 5 लोकांना आधी भोजन करवायला पाहिजे

आमच्या शास्त्रात भोजन संबंधी बर्‍याच गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. विष्णू पुराणानुसार स्वयं भोजन करण्याअगोदर आम्हाला खाली सांगण्यात आलेल्या 5 लोकांना आधी भोजन करवायला पाहिजे. जे व्यक्ती असे न करता स्वतः: आधी भोजन करून घेतात ते पापाचे भागीदार बनतात.  
 
ततः स्ववासिनीदुः खिगर्भिणीवृद्धबालकान्। 
भोजयेत्संस्कृतान्नेन प्रथमं चरमं गृही।। 
अर्थात- 
गृहस्थ पुरुषाला आपल्या घरात राहणारी विवाहित कन्या, घरी आलेले दुखी मनुष्य, गर्भवती स्त्री, बालक व वृद्ध व्यक्तीला भोजन करवल्यानंतरच स्वत:ला भोजन करायला पाहिजे.  
या श्लोकानुसार आम्हाला घरातील विवाहित पुत्रीला भोजन करवायला पाहिजे. अर्थात जर लग्न झाल्यावर मुलगी आपल्या वडिलांच्या घरी येते तर तिला सर्वात आधी भोजन करवायला पाहिजे.   
एखाद्या दुखी व्यक्तीला भोजन करवायला पाहिजे. असे केल्याने घरातील अडचणींना लगाम लागते आणि घरात शांतीचे वातावरण राहते.   
विष्णू पुराणात सांगण्यात आले आहे की स्वत: भोजन करण्याअगोदर गर्भवती स्त्रीला भोजन करवणे गरजेचे आहे.  
बालकाला देखील स्वत:च्या आधी भोजन देणे आवश्यक मानले जाते. मुलं भुकेवर नियंत्रण ठेवू शकत नाही म्हणून मुलांना आधी भोजन द्यायला पाहिजे.  
स्वत: भोजन करण्याअगोदर घरातील वृद्ध आणि वरिष्ठजनांना भोजन देणे फारच महत्त्वपूर्ण मानले जाते. असे केल्याने घरातील सर्व अडचणी दूर होतात आणि घराचे वातावरण आनंदी राहत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती