कार्तिक महिन्यात तुळशी पालटेल आपलं नशीब

शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019 (13:16 IST)
कार्तिक मास सुरू असून या महिन्यात व्रत, पूजा आणि कार्तिक स्नान याचे अत्यंत महत्त्व आहे. कार्तिक माह सर्वात पवित्र महिना असल्याचे मानले गेले आहे. कार्तिक महिन्यात तुळशी पूजेचं महत्त्व अधिकच वाढून जातं. 
 
धार्मिक मान्यतेनुसार या महिन्यात शालिग्राम आणि तुळशी यांचा विवाह देखील असतो.
 
या पवित्र महिन्यात काही लहानसे उपाय आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. अनेकदा खूप प्रयत्न करून देखील कामात यश मिळत नाही. दुर्दैवाने आपलं भाग्य आपलं साथ देत नाही तर हा महिना आपल्यासाठी फल प्राप्तीचा ठरेल. या महिन्यात तुळशीच्या पानांच्या उपायांनी देवी लक्ष्मी आणि धन कुबेराची कृपा होते, ज्याने सर्व प्रकाराच्या अडचणी दूर होतात. तर जाणून घ्या या उपायांबद्दल...
 
प्रगतीसाठी
नोकरी मिळवण्यासाठी, व्यवसायात प्रगतीसाठी गुरुवारी तुळशीचं रोप पिवळ्या कपड्यात बांधून ऑफिस किंवा दुकानात ठेवा. असे केल्याने व्यवसायात वृद्धी होईल आणि नोकरीत प्रमोशन होईल.
 
संपत्तीसाठी
कार्तिक महिन्यात घरात तुळशीचं रोप लावावं, यासोबत श्रीहरी नारायणाचे चित्र किंवा मूर्ती घरात ठेवावी आणि त्यावर तुळशीचे 11 पानं बांधावे. असे केल्याने घरात कधीही संपत्तीची कमी राहत नाही.
 
धन लाभासाठी
धन लाभासाठी सकाळी उठून तुळशीचे 11 पानं तोडावे. हे पानं तोडण्यापूर्वी तुळशीसमोर हात जोडून क्षमा मागावी आणि नंतर पाने तोडावे. हे पान स्वयंपाकघरात कणीक ठेवत असलेल्या कंटेनर किंवा भांड्यात ठेवावं. या प्रयोगाने काही दिवसात घरात बदल दिसू लागेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती