Mauni Amavasya 2020 अमावस्येला अशुभ घडू नये म्हणून हे टाळा

गुरूवार, 23 जानेवारी 2020 (13:06 IST)
असे म्हणतात की अमावस्येच्या दिवशी नकारात्मक उर्जेचा प्रभाव अधिक असतो. म्हणून या दिवशी पूजा, जप-तप करणे खूप शुभ मानले गेले आहे. ज्योतिष्यांप्रमाणे काही कार्य या दिवशी करणे टाळावा कारण काही कामांचे विपरित परिणाम हाती लागू शकतात.
 
मौनी अमावस्येच्या दिवशी सकाळी उशीरापर्यंत झोपणे योग्य नाही. या दिवशी लवकर उठून मौन राहून पाण्यात काळे तीळ मिसळून स्नान करणे शुभ असतं. नंतर विधिपूर्वक पूजा- अर्चना करावी.
 
अमावस्येच्या रात्री स्मशान घाटाच्या जवळपास भटकू नये. 
 
या दिवशी स्त्री आणि पुरुषांनी शारीरिक संबंध स्थापित करू नये. मौनी अमावस्येच्या दिवशी यौन संबंध ठेवल्याने जन्माला येणार्‍या संतानला जीवनभर कष्ट सहन करावे लागू शकतात.
 
मौनी अमावास्येचा दिवस देवता आणि पितरांसाठी मानला गेला आहे. म्हणून या दिवशी पितरांना खूश करण्यासाठी आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे. शिवीगाळ, मतभेद याला बळी न पडता शांत राहून देवाचं नाव घ्यावं.
 
या दिवशी गरीब किंवा गरजू व्यक्तींना दान करणे आणि त्यांची मदत करणे शुभ मानले गेले आहे. म्हणून या दिवशी अशा लोकांचा अपमान करू नये. तसेच वृद्ध लोकांचा अपमान देखील करणे योग्य नाही. असे केल्याने शनिदेव नाराज होतात.
 
असे म्हटलं जातं की या दिवशी वड, मेंदी आणि पिंपळाच्या झाडाखालून जाणे टाळावे. मान्यता आहे की या दिवशी झाडांवर आत्म्यांचा वास असतो आणि अमावस्येच्या दिवशी त्या अजून शक्तिशाली होऊन जातात. म्हणून झाडांच्या खालून जाऊ नये.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती