अशा लोकांना वनस्पती देव देतात शिक्षा

मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (15:06 IST)
हिंदू धर्मात निसर्गाचे खूप महत्त्व आहे. हिंदू धर्मात सर्व सण प्रकृतीशी निगडित आहे. निसर्गाकडून आम्हाला फळं, फुलं, भाज्या, औषधे, जडी-बुटी, मसाले, धान्य आणि पाणी इ प्राप्त होतं. म्हणून निसर्गाचं संरक्षण करणं आमचं कत्वर्य आहे. हिंदू धर्मात निसर्गाची रक्षा, संवरक्षण किंवा उत्पादनाशी निगडित अनेक देव आहेत त्याच प्रकारे निसर्ग देव देखील आहे. जाणून घ्या त्याच्या बद्दल रोचक माहिती-
 
धर धरतीचे देव, अनल अग्नीचे देव, अनिल वायूचे देव, आप अंतराळाचे देव आहे, द्यौस या प्रभाष आकाशाचे देव आहे, सोम चंद्रमासाचे देव, ध्रुव नक्षत्रांचे देव आहे, प्रत्यूष या आदित्य सूर्याचे देव आहे. आकाशाचे देवता अर्थात स्व: (स्वर्ग):- सूर्य, वरुण, मित्र, पूषन, विष्णु, उषा, अपांनपात, सविता, त्रिप, विंवस्वत, आदिंत्यगण, अश्विनद्वय इतर. अंतराळाचे देवता अर्थात भूव: (अंतरिक्ष):- पर्जन्य, वायु, इंद्र, मरुत, रुद्र, मातरिश्वन्, त्रिप्रआप्त्य, अज एकपाद, आप, अहितर्बुध्न्य. पृथ्वीचे देवता अर्थात भू: (धरती):- पृथ्वी, उषा, अग्नी, सोम, बृहस्पती, नद्या इतर.
 
वनस्पती देव
1. दहा विश्व देवांपैकी एक आहे वनस्पती देव. पुराणात दहा विश्व देवांचा उल्लेख सापडतो ज्यांचे अंतराळात एक वेगळेच लोक आहे.
 
2. वनस्पती देवाचे ऋग्वेद आणि सामवेद यात उल्लेख आढळतो.
 
3. वनस्पती देव वृक्ष, गुल्म, लता, वल्लींचे पोषण-भरण आणि त्यांच्या अनुशासनाच्या कार्याचे निर्वहन करतात.
 
4. वनस्पतीचा अपमान केल्याने, त्यांना नुकसान पोहचवल्याने आणि ग्रहणकाळात किंवा सूर्यास्तानंतर झाडांचा कोणताही अंग वेगळ्या केल्याने ते शिक्षा करतात.
 
5. वनस्पती देव हिरण्यगर्भा ब्रह्माच्या केसांनी निर्मित झाले होते.
 
6. आरण्यिका नागदेव, वनदुर्गा आणि मरुतगण यांसह वनस्पती देव देखील निसर्गाचे रक्षक आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती