शनिदेवाला नसून, महादेव आणि गणपतीला वाहतात शमीचे पानं

आता श्रावण महिना सुरू होणार आहे. या महिन्यात महादेवाच्या पूजेचे खास महत्त्व असते. शिवलिंगावर वेग वेगळ्या वस्तू अर्पित केल्या जातात. शिवपुराणानुसार महादेवाच्या पूजेत फूल पानांचे विशेष महत्त्व आहे. शिवलिंगावर बेलपान (बिल्व पत्र) सर्वच वाहतात, पण त्याचसोबत महादेवाला शमीचे पानं देखील अर्पित करायला पाहिजे. खास करून शमीचे पान शनीला वाहिले जातात, पण हे पान महादेवाला आणि गणपतीला देखील अर्पित करू शकता. तर जाणून घ्या शमीच्या झाडाच्या काही खास गोष्टी ...
 
श्रीरामाने केले होते शमीच्या वृक्षाचे पूजन  
शमीला पूजनीय मानले जाते त्याचे एक कारण म्हणजे लंकावर विजय मिळवल्यानंतर श्रीरामाने शमीच्या वृक्षाचे पूजन केले होते. एक अजून मान्यतेनुसार महाभारत काळात पांडवांनी आपल्या अज्ञातवास दरम्यान शमीच्या वृक्षात आपले अस्त्र-शस्त्र लपवले होते. यामुळे शमीचे फार महत्त्व आहे.  
 
असे वाहायला पाहिजे पान  
श्रावण महिन्यात रोज सकाळी महादेवाच्या मंदिरात जाऊन तांब्याच्या लोट्यात गंगाजल किंवा पवित्र जलमध्ये गंगाजल, तांदूळ, पांढरे चंदन मिसळून शिवलिंगावर 'ऊँ नम: शिवाय' मंत्र बोलत अर्पित करावे.  
जल अर्पित केल्यानंतर महादेवाला तांदूळ, बिल्वपत्र, पांढरे वस्त्र, जानवं आणि मिठाईसोबत शमीचे पान अर्पित केले पाहिजे.  
 
शमीचे पान चढवताना हे मंत्र म्हणावे  
 
अमंगलानां च शमनीं शमनीं दुष्कृतस्य च।
दु:स्वप्रनाशिनीं धन्यां प्रपद्येहं शमीं शुभाम्।।
 
शमी पत्र वाहिल्यानंतर महादेवाला धूप, दीप आणि कर्पूरने आरती करून प्रसाद ग्रहण केला पाहिजे.   
गणपतीच्या पूजेत देखील तांदूळ, फळ, फूल, शेंदूर सोबत शमीचे पान वाहिला पाहिजे. गणपतीला शमीचे पान वाहताना हे मंत्र बोलायला पाहिजे ...
मंत्र-
त्वत्प्रियाणि सुपुष्पाणि कोमलानि शुभानि वै। 
शमी दलानि हेरम्ब गृहाण गणनायक।।

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती